आंतरशालेय गीतगायन स्पर्धेत सरस्वती हायस्कूलचा उस्फूर्त सहभाग

आज दिनांक १७ डिसेंबर या दिवशी दादासाहेब दांडेकर विदयालय भिवंडी या माध्यमिक शाळेत “आंतरशालेय वैयाक्तिक गीतगायन” स्पर्धेचा कायर्क्रम उत्साहात साजरा झाला.

या विदयालयात विदयार्थ्यासाठी `लहान गट’ व `मोठा गट’ या दोन गटांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. या आंतरशालेय स्पर्धेत वैयाक्तिक गीतगायनाला महत्त्व दिले गेले.

या स्पर्धेत भिवंडी तालुक्यातील जवळपास २५ शाळांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा विविध स्तरांवरील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. गायनात तबला व पेटीचा वापर अनिवार्य होता त्यामुळे बहुतांशी शाळांनी सांस्कृतीक गीतांना महत्त्व दिले.

या स्पर्धेत सरस्वती हायस्कूल मधील कुमारी दिपाली काळीराम पाटील ही मोठा गट व कुमार हर्ष प्रेमजी नकुम हा लहान गट वैयक्तिक स्पर्धेत सहभागी होते. दोन्ही गटांतील स्पर्धेनंतर श्री त्रिलोकचंद्रजी जैन  यांच्या अध्यक्षतेखाली निकालाची घोषणा केली. दोन्ही गटात १,२,३. क्रमांक काढण्यात आले. सहभागी  विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व चषक देण्यात आले. सहभागी  विदयार्थ्याचाही प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

शेवटी अध्यक्षाच्या भाषणा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

श्री केयूर ठक्कर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्याची तयारी झाली होती.