भिवंडीत रंगली थाया बॉक्सींग

दिनांक १९ नोव्हेंबर रोजी भिवंडीत पदमानगर येथील बालाजी मंदीर येथे. `थाया बॉक्सींग क्रीडा स्पर्धा २०१६-१७ चे आयोजन केले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेत भिवंडीतील बऱ्याचशा शाळा व क्लासेस नी सहभाग घेतला. त्यामध्ये`सरस्वती इंग्लिश हायस्कूल मधील’ ६ मुलींनी भाग घेतला होता.प्रशिक्षक राजाराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अखिलेश सर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेची शाळेत तयारी घेतली गेली.

थाया बॉक्सींग या स्पर्धसाठी विविध वजनगटांचे निकष लावले होते. या वजनगटांत बेसिक ( Basic ) किक ( kick ) बॉक्सींग अशा विविध पातळ्यांवर ही स्पर्धा झाली.

या तालुकास्तरीय स्पर्धेत विजेत्या घोषित केलेल्या विदयार्थ्यास प्रशस्तीपत्रक बहाल केले. स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम स्पर्धकाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

सरस्वती हायस्कूलमधील सिरीमल्ला वैशाली, निशा यादव, विश्वकर्मा शितल, कुडीक्याला अश्विनी, प्रजापती ज्योती हया विदयार्थीनी व्दीतीय स्पर्धक ठरल्या तर येरा संध्या, बेथी नेहा व यादव प्रिया या प्रथम स्पर्धक म्हणून घोषित होऊन त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.