Marathi Day

जागतिक मराठी भाषा दिवस

दिनांक २७ फेब्रुवारी २०१७,

वि.वा.शिरवाडकर म्हणजे मराठी भाषेचे भूषण त्यांना संपूर्ण महाराष्ट्र कुसुमाग्रज या नावाने ओळखते.हे महाराष्ट्रातील नावाजलेले कवी,लेखक व नाटककार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे नेहमीच स्मरण व्हावे तसेच त्यांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी म्हणून ‘२७ फेब्रुवारी ‘ म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा “मराठी राजभाषा दिवस” म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो .

आपल्या ‘ सरस्वती इंग्लिश हायस्कूल ‘ मध्ये मराठी दिवस साजरा केला . विविध परंपरा जपतानाच महाराष्ट्रात रहाणाऱ्या मराठी भाषिकांबरोबर अमराठी भाषिकांना मराठीची महती पटवून देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट होय. मराठी ही इथली बोलीभाषा तसेच कार्यालयीन भाषा आहे ती बोलणे व तिचे आदानप्रदान करणे कसे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले .इंग्रजी माध्यम असूनही एक दिवस पूर्णतः मराठीसाठी देऊन सर्वांकडून मराठीचा आग्रह धरला गेला .

कार्यक्रमात मुलांनी मराठीत नाटीका सादर केली. इयत्ता  ८,९वी च्या मुलांनी मराठीचा गोडवा गाणारे लाभले आम्हास भाग्य हे गीत सादर केले . ७वी व ८वी च्या विद्यार्थ्यांनी शिरवाडकरांच्या कवितांचे सादरीकरण केले.इ.५.वी ची विद्यार्थीनी पंडीता निकीता हिने मराठीची उपयुक्तता सांगणारे अप्रतिम भाषण दिले .पाटील दिया , पाटील भूमी,पाटील जिया ,जलदा श्रृती ह्यांनी कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला . कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन इ.९वी ची विद्यार्थीनी कु.दिपाली पाटील हिने केलेर्गाने. प्रत्येक वर्गाने मराठीतील समूहगीते सादर केली .त्यानंतर माझी माय मराठी ह्या विषयावर सौ.कविता पाटील यांनी कवितावाचन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मराठीच्या शिक्षिका सौ . वर्षा वांद्रे मॅडम यांनी  सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .