लोकशाही पंधरवडा

आमच्या सरस्वती इंग्लिश हायस्कूल ,नारपोली या शाळेत 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 पर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात आला .
या दिवसांत मुलांना लोकशाही कार्यपद्धती चे महत्त्व सांगितले त्यासाठी शाळेत पालक सभाही आयोजित केली होती.या पालकसभेसाठी शाळेच्या कार्यात नेहमीच उत्सुक असणाऱ्या तसेच राजकारण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पालकांना निमंत्रित करण्यात आले होते.
तसेच विद्यार्थ्यांसमोर लोकशाही मतदान पद्धत कशी असते व या शासन पद्धतीने प्रशासन कसे चालवले जाते हे दर्शवणारी नाटिका आयोजित करण्यात आली .सदर नाटिका इ 6वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केली