All the parents are hereby informed that, we have started RTE-25% Admissions for the year 2020-21 in the school. Parents should submit their application forms in the school as per instructions given below –
सर्व पालकांना सूचित करण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई अंतर्गत 25टक्के प्रवेश प्रक्रिया आपल्या शाळेत सुरू झाली आहे. तरी सर्व पालकांनी खाली दिलेल्या सुचनांच्या आधिन राहून शाळेत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा –
सूचना –
- प्रवेश फॉर्म आणि कागदपत्रे जमा करण्याची तारीख 29 जून 2020, वेळ सकाळी 10 ते सायं 4 पर्यंत
- शाळेत येतांना बालकांना / मुलांना घेऊन येऊ नये
- सर्व कागदपत्रे एका बंद पाकीटात भरून शाळेत ठेवलेल्या डब्यात जमा करावीत
- कागदपत्रांची शालेय स्तरावर पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित झाल्याचे कळविण्यात येईल
- शाळा चालू झाल्यानंतर शाळेस आवश्यक नसलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति आपणांस परत केल्या जातील
- पडताळणीमध्ये कागदपत्रे चुकीची आढळल्यास किंवा ऑनलाईन पोर्टलवर चुकीची माहिती दिली असल्यास तसे आपणांस कळविले जाईल
बंद पाकिटात पुढील कागदपत्रे टाकावे
- अलॉटमेंट लेटर (शाळा प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र) – 3 Copies
- मुलाचा / मुलीचा मूळ जन्मदाखल्याची प्रत – 1 Original, 2 Copies
- मुलाचा / मुलीचा आधार कार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स प्रत) 2 Copies
- उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत – 1 Original + 2 Copies
- जातीचा दाखला मूळ प्रत – 1 Original + 2 Copies
- वास्तव्याच्या ठिकाणाचा पुरावा – 2 Copies
- मुलाचे दोन पासपोर्ट फोटो