Curriculum
- 21 Sections
- 20 Lessons
- 10 Weeks
- 1. तू बुद्धी दे (10MAR1)2
- 2. संतवाणी (10MAR2)2
- 3. शाल (10MAR3)2
- 4. उपास (10MAR4)2
- 5. दोन दिवस (10MAR5)2
- 6. चुडीवाला (10MAR6)2
- 7. फूटप्रिन्टस (10MAR7)2
- 8. ऊर्जाशक्तीचा जागर (10MAR8)2
- 9. औक्षण भाग (10MAR9)2
- 10. रंग साहित्याचे (10MAR10)2
- 11. जंगल डायरी (10MAR11)2
- 12. रंग मजेचे रंग उदयाचे (10MAR12)2
- 13. हिरवंगार झाडासारखं (कविता) (10MAR13)2
- 14. बीज पेरले गेल (10MAR14)2
- 15. खरा नागरिक (10MAR15)2
- 16. स्वप्न करू साकार (कविता) (10MAR16)2
- मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)1
- जाता अस्ताला (स्थूलवाचन)1
- जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)1
- व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)1
- Question papers4
Assignment (10MAR11)
ता.२७ मे १९९७, वेळ-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्या घ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेच कोळसावन वि श्रामगृहातून बाहेर पडलो.
गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यां चा सहकारी वनमजूर येताना दि सले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्ना र्थक नजरेनं पाहि लं, तर त्या नं रस्त्याक डं बोट रोखलं. नुकत्या च गेलेल्या एका मोठ्या बि बळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्या च्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहि लं; पण मला तरी काही दि सलं नाही.
अचानक मला जंगलाच्या कोपऱ्या वर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली.दुर्बीण डोळ्यांना लावल्या वर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता;पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्या मुळे त्यानं अद्याप आम्हां ला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि ‘कट् ’ असा आवाज झाला. तिखट कानांच्या बि बळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.
बिबळ्याच्या नि रीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शरमिंदं झाल्या सारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्या सारखं वाटलं. इथं दोन-तीन नाले असल्या नं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्या नं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणेपावलं टाकणं आवश्यक होतं.
कालच संध्याकाळी वि श्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार प ल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगि तलं होतं. तेव्हा पासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्या नंवाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणंदेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर! पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, कुणाचा जीवदेखील घ्याय ला मागं-पुढं बघत नाही. त्या मुळं सुकलेल्या नाल्या त उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं.
दहा-बारा पावलंच चाललो असू. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्या च पाऊलखुणा होत्या . त्या पगमार्क्सकडं बघून लक्षात अालं, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे शंभर-सव्वाशे पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्या मुळं आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्या वरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती.
पाणवठा जसा जवळ अाला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल, या जाणिवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यां नीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एकेक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठंतरी झाडाच्या बुंध्या आड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार, असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळदेखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, असं वाटत होतं.
‘‘ऑऽ वऽऽ’’ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्या सानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात ‘धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वा सक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्या मुळं तिलाही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लां जवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्या च्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.
साधारणत: कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्याघेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्या वर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनंहळूच ‘ऑऽवऽ’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्या मुळं पिल्लां जवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली.आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation