Curriculum
- 21 Sections
- 20 Lessons
- 10 Weeks
- 1. तू बुद्धी दे (10MAR1)2
- 2. संतवाणी (10MAR2)2
- 3. शाल (10MAR3)2
- 4. उपास (10MAR4)2
- 5. दोन दिवस (10MAR5)2
- 6. चुडीवाला (10MAR6)2
- 7. फूटप्रिन्टस (10MAR7)2
- 8. ऊर्जाशक्तीचा जागर (10MAR8)2
- 9. औक्षण भाग (10MAR9)2
- 10. रंग साहित्याचे (10MAR10)2
- 11. जंगल डायरी (10MAR11)2
- 12. रंग मजेचे रंग उदयाचे (10MAR12)2
- 13. हिरवंगार झाडासारखं (कविता) (10MAR13)2
- 14. बीज पेरले गेल (10MAR14)2
- 15. खरा नागरिक (10MAR15)2
- 16. स्वप्न करू साकार (कविता) (10MAR16)2
- मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)1
- जाता अस्ताला (स्थूलवाचन)1
- जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)1
- व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)1
- Question papers4
Assignment (10MAR4)
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्येमाझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याएेंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्डमाझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.
‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थमला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर. ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’
‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. ‘‘बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.’’ एक सल्ला. ‘‘भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.’’ काशीनाथ नाडकर्णी.
‘‘मुख्य म्हणजे साखर सोडा.’’
‘‘मी सांगू का? मीठ सोडा.’’
‘‘लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.’’
‘‘तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.’’ बाबूकाका.
‘‘दिवसा झोपणं सोडा.’’
‘‘खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.’’
मी मात्र या सर्व जनांचे एेकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी ‘आहारपरिवर्तन’ सुरू केले.
साखरेत सर्वांत अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटामिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. ‘‘मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर.’’ एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता, याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ‘ही’ निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही.
पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कँटीनच्या आचाऱ्याने तर माझ्या ‘डायट’ वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी ‘एफिशिएन्सी बार’च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेे गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते-म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल ‘वनस्पती’तला, त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हादडून शेवटी
‘भज्यांशिवाय पार्टी कसली?’ या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली.
शेवटी मला राहवेना. भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर, मी अत्यंत केविलवाण्या स्वरात ‘सध्या मी ‘डाएट’वर असल्याचे’ सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले.
‘‘अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध?’’ भिकोबा मुसळे म्हणाला, ‘‘मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले-एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहाणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?’’
‘‘नॉन्सेन्स!’’ जगदाळे ओरडला, ‘‘रनिंग कर रोज.’’
‘‘रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी.’’ कु. कमलिनी केंकरे म्हणाली.
शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी सातव्या बशीमधले भजे उचलले.
कुटुंबाचा मात्र माझ्या ‘डाएटच्या’ बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला.
‘‘चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग’’, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला.
‘‘हेच ते-म्हटलं ते काय उगीच? अहाे, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी!’’
‘‘नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?’’
‘‘अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता.’’
‘‘म्हणजे खलास! अग, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन? पण सांगितलं का नाहीस मला?’’
‘‘उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन.’’ मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय-संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.
‘‘लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!’’
‘‘इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!’’
तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच!
दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्णफिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खाेलीत असूनही आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.
‘‘हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.’’
‘‘पण... मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.’’
‘‘काही उपयोग होणार नाही!’’
‘‘का?’’
‘‘का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील.’’
‘‘आता ह्या उड्या मारायला मी लाजदेखील सोडली हे पाहता ना तुम्ही, बाबा?’’
‘‘ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा.’’
‘‘बोलणं सोडू?’’
‘‘अजिबात! खाण्यासाठी तांेडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही; पण बोलण्यासाठीदेखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहाणार नाही.’’
‘‘पण मला बोललंच पाहिजे, बाबा.’’ मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. ‘‘का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्यमोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही...’’
उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास ‘मौनाचं महत्त्व’ या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, ‘‘पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय?’’
‘‘म्हणजे? बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय?’’
‘‘मी टेलिफोन-ऑपरेटर आहे, बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला.’’
‘‘मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?’’ अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, या विचाराने मला पश्चात्ताप झाला.
मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस्स. यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास! मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय; पण बिनचहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली, की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या ‘दुष्टपणाने व आकसाने’ केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दहा उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली, की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्त्विक आहार सुरू केला. जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला; पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध! दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती; पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले.
पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच ‘‘पंत, फरक दिसतो हं!’’ अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही ‘‘पंत, भलतेच काय हो रोडावलेत.’’ असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो.
इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन...
मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पौंड आणि भविष्य होते : ‘आप बहुत समझदार और गंभीर है!’हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषत: डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation