Curriculum
- 21 Sections
- 20 Lessons
- 10 Weeks
- 1. तू बुद्धी दे (10MAR1)2
- 2. संतवाणी (10MAR2)2
- 3. शाल (10MAR3)2
- 4. उपास (10MAR4)2
- 5. दोन दिवस (10MAR5)2
- 6. चुडीवाला (10MAR6)2
- 7. फूटप्रिन्टस (10MAR7)2
- 8. ऊर्जाशक्तीचा जागर (10MAR8)2
- 9. औक्षण भाग (10MAR9)2
- 10. रंग साहित्याचे (10MAR10)2
- 11. जंगल डायरी (10MAR11)2
- 12. रंग मजेचे रंग उदयाचे (10MAR12)2
- 13. हिरवंगार झाडासारखं (कविता) (10MAR13)2
- 14. बीज पेरले गेल (10MAR14)2
- 15. खरा नागरिक (10MAR15)2
- 16. स्वप्न करू साकार (कविता) (10MAR16)2
- मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)1
- जाता अस्ताला (स्थूलवाचन)1
- जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)1
- व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)1
- Question papers4
Assignment (10MAR8)
शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे; पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती.
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात
होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!
पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती; पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले; पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडांतील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली; पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.
अखेर युनियन हायस्कूलमध्येमला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच; पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वत:ला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला
असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली.
आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळं उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त तीन पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही; पण तेव्हा दर आठवड्याला हे तीन पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यांत पाणी उभं राहायचं. आजही हे आठवलं, की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली. रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत; पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं, की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली. त्याच वेळी तिनं ठरवलं, की ‘मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय
या जगात मान नाही.’
तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दांतून सांगू? कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. त्यामुळं जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागे.
याच हायस्कूलमध्येमला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न्क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation