Curriculum
- 21 Sections
- 20 Lessons
- 10 Weeks
- 1. तू बुद्धी दे (10MAR1)2
- 2. संतवाणी (10MAR2)2
- 3. शाल (10MAR3)2
- 4. उपास (10MAR4)2
- 5. दोन दिवस (10MAR5)2
- 6. चुडीवाला (10MAR6)2
- 7. फूटप्रिन्टस (10MAR7)2
- 8. ऊर्जाशक्तीचा जागर (10MAR8)2
- 9. औक्षण भाग (10MAR9)2
- 10. रंग साहित्याचे (10MAR10)2
- 11. जंगल डायरी (10MAR11)2
- 12. रंग मजेचे रंग उदयाचे (10MAR12)2
- 13. हिरवंगार झाडासारखं (कविता) (10MAR13)2
- 14. बीज पेरले गेल (10MAR14)2
- 15. खरा नागरिक (10MAR15)2
- 16. स्वप्न करू साकार (कविता) (10MAR16)2
- मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)1
- जाता अस्ताला (स्थूलवाचन)1
- जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)1
- व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)1
- Question papers4
Assignment (10MAR10)
सुश्रुत : तुम्ही सगळे कोण आहात?
कथा : अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव.
सुश्रुत : आपली ओळख कशी काय?
कथा : आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हांला मला वाचायची सवय लागते ना!
सुश्रुत : होऽऽ आता आठवलं आजी मला नेहमी कोल्हा , उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.
कथा : बरं का सुश्रु त! आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये.
सुश्रुत : तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या , ‘‘आपण ‘साहस कथा’ शिकूया.’’
कथा : अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, वि ज्ञानकथा, ऐति हासि क कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जे दार असल्याशिवाय णतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते,रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य.
सुश्रुत : तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांगना -
कथा : य. गो. जोशी, वि . स. खांडेकर, वि भावरी शि रूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व. पु. काळे, शंकर पाटील, ण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, द. मा. मि रासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखक, लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय.
सुश्रुत : कित्ती सुंदर! आता ही ताई कोण बरं?
कादंबरी : काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवंतर. कादंबरी म्हणजे खरंतर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा!
सुश्रुत : मोठा म्हणजे कि ती गं?
कादंबरी : अरे, माझ्या त खूप खूप पात्रं असतात. त्यांचा परस्परसंबंध असतो. विविध घटना, प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्रं तुम्हांला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत-घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल? याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो.
सुश्रुत : खरंच, तुझा आवाका खूपच मोठा आहे.
कादंबरी : बरं का सुश्रु त, साहि त्य क्षेत्रा तील सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्का र वि . स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मि ळाला. तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिम ानानं भरून आला. (इतक्या त कवि ता सुश्रुतच्या खांद्याला धरून वि चारते.)
कविता : सुश्रुत, ओळखलंस मला? अरे, मी आहे कवि ता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकांतल्या सगळ्या कवि ता तुम्ही तालासुरांत म्हणता.
सुश्रुत : हो ताई! मला आठवतंय. ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ आणि ‘श्रा वणमासी हर्ष मानसी’ या माझ्या
आवडत्या कविता.
कविता : छान हं. सुश्रु त, माझं रूप छोटंसं, आटोपशीर. मोजक्या शब्दां त मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य . यमक, अनुप्रास अशा शब्दा लंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा , रूपक यांसारख्या
अर्था लंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात.
सुश्रुत : मॅडम नेहमी सांगतात कवि तेची शब्दरचना अर्थ पूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना?
कविता : अगदी बरोबर! आणखी काय माहीत आहे सुश्रु त तुला?
सुश्रुत : ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला, की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचताे आणि सीडींमधून, चित्रपटांमधून ऐकतोसुद्धा.
कविता : छान निरीक्षण आहे हं तुझं. बरं, मला एक सांग तुझ्या शाळेत मराठी दि न साजरा करतात का?
सुश्रुत : हो, करतात ना.
कविता : कोणत्या तारखेला करतात?
सुश्रुत : अंऽऽऽ, २७ फेब्रुवारीला.
कविता : अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे, माहीत आहे तुला?
सुश्रुत : नाहीग.
कविता : ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक वि . वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज यांचा.
सुश्रुत : खरंच?
कविता : कुसुमाग्रजांबरोबरच केशवसुत, बालकवी, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढे कर, शांता शेळके, इंदि रा संत, सुरेशभट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवी, कवयित्रींनी मला आपल्या प्रति भेने सजवले. संतकाव्या पासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहि री काव्य अशी वळणे घेत आधुनि क काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.
नाटक : अरे सुश्रुत, ओळखलंस का मला?
सुश्रुत : तू कोण आहेस रे?
नाटक : माझ्या कडे बघ म्हणजे तुला कळेल.
सुश्रुत : अरे, नाटकदादा तूऽऽ
नाटक : पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यांमुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळस्थान प्राप्त करतो. तुला माहीत आहे, माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय अन् प्रेक्षणीय व्हा वं अशी त्या ची अपेक्षा असते.
सुश्रुत : मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. त्या चं दिग्दर्शन उत्तम होतं, असे बाबा म्हणाले.
नाटक : वाऽऽ छान! अरे, दिग्दर्श कासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्री पाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसुदन कालेलकर, प्र. के. अत्रे अशा दि ग्गज लेखकांनी मला समर्थ पणे हाताळलं.
चरित्र : ए, सुश्रु त, शुक् शुक् इकडे बघ.
सुश्रुत : कोण बोलवतंय मला?
चरित्र : अरे मी! मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्या तून त्या च्या आयुष्या ची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते. त्या तूनच मी जन्माला येतो.
सुश्रुत : मॅडम नेहमी म्हणतात, की थोरांची चरित्रं सामान्यां ना प्रेरणा देतात म्हणून.
चरित्र : अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय , कर्तृ त्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मनं, मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा. द. खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले.
सुश्रुत : वा! सर्व ताई-दादांनी मला कित्ती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं?
आत्मचरित्र : मी आत्मचरित्र. चरित्रां च्या च कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन, तर मी म्हणजे व्यक्तीने स्वत:च्या जीवनप्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्ण न. माझ्या आयुष्यात
आलेल्या विविध टप्प्यां चे, वळणांचे, भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्या तून मी साकारला जातो. स्वा तंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक.
सुश्रुत : अरे, सर्वांत शेवटी तो कोणता दादा उभा आहे? आणि तो माझ्या शी बोलणार नाही का?
प्रवासवर्णन : का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी, देशी पोहोचवणार ना?
सुश्रुत : म्हणजे? आणि ते कसं काय?
प्रवासवर्णन : माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठि काणी प्रवास करून आल्या नंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठि काणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहि ती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती रटाळ, कंटाळवाणीन होऊ देता रंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब. लेखक त्या ठिकाणच्या माहि तीबरोबरच स्वत:चे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो.सुश्रुत : म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विम ान मी कुठेही जाऊ शकतो. सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून.
प्रवासवर्णन : अगदी बरोबर आणि हेच माझं वैशिष्ट्य . म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा. भि . जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं.
सुश्रुत : कित्ती छान आहात तुम्ही सगळेजण! तुमच्या शी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्या सारख्या नि:स्वार्थी मित्रांम ुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि .... त्यामुळे माझे लेखनही सुधारेल.
सगळे : आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही.
पुस्तके : (सगळे गातात) साहित्याचे रंग विविध हे, भुलविती साऱ्या रसिकजना इंद्रधनु ते सप्तरंगी जसे, सुशोभित करते गगना धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्यसंपदा वाचू आनंदे, लिहू नेमाने, वाङ् मय रसात न्हाऊ सदा.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation