टप् टप् पडती (7MAR6)
टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे!
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली वि णते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशी ने डुले!
दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फादी वरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस, वारा, मोरपि सारा या गाण्या तुन फुले!
फुलांसारखे सर्व फुला रे, सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणेगाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे!