माझ्या अंगणात (7MAR3)
गहू शाळवाचं मोती
काळ्या रानात सांडलं,
आणि माझ्या अंगणात
लख्ख चांदणं पडलं ।।१।।
काळ्याशा रमातीतुनी
मोती-पवळ्याची रास,
अंगणात माझ्या डुले
रानमेव्याची मिजास ।।२।।
दिला-घेतला वाढतो
रानातला रानमेवा,
तुम्ही आम्ही सारेजण
गुण्या गोविंदानं खावा ।।३।।
जीव दमतो, शिणतो
घास भरवते माय,
घरामंदी घरट्यात
जशी दुधातली साय ।।४।।
अंगणात आज माझ्या
दाणं टिपती पाखरं,
दूर उडुनि या जाता
आसू येती गालावर ।।५।।