शब्दांचे घर (7MAR8)
सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर
त्यांतून काही हळवे हळवे राहत होते स्वर
घरात होता, काना-मात्रा-वेलांटीचा मेळ
एकोप्या ने खेळायाचे सगळे अक्षर-खेळ
विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर
सुंदर सुंदर शब्दां चे सुंदर सुंदर घर
एखाद्याची धुसफुससुद्धा हवीह वीशी छान
प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदु:खाचे भान
मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर
सुंदर सुंदर शब्दां चे सुंदर सुंदर घर
कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा
वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा
अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर
सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर