संतवाणी (8MAR13)
जि सोनियाचा दिवस ।
दृष्टीं देखिलें संतांस ।।१।।
जीवा सुख झालें ।
माझें माहेर भेटलें ।।२।।
अवघा निरसला शीण ।
देखतां संतचरण ।।३।।
आजि दिवाळी दसरा ।
सेना म्हणे आले घरा ।।४।।
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी ।
हेकळी टाकळी चंदनाची ।।१।।
संतांचिया संगें अभाविक जन ।
तयाच्या दर्शनें तेचि होती ।।२।।
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा ।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ।।३।।