मी चित्रकार कसा झालो! (8MAR2)
मी तुमच्याएवढा असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हांला सांगणार आहे. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत रहा, तुम्हांला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील.
आता तुम्हांला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगलं. दुथडी भरून वाहणारी नदी. निळे डोंगर, हिरवी रानं. अवघा आनंदी आनंद! अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच! माझा एक मित्र होता. आम्हांला खूप वाटायचं, की आपण चित्रं काढावीत; पण काय करणार? अामच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल. तिचे तुकडे झाले, तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता, की चित्रंबित्रं काढलेली ना मास्तरांना वडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. [8.2.1]
वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला, की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. पाण्याच्की पडते. अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार! मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्रं रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं, तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची सालटं गेलेली लक्षातच यायची नाहीत. मग उभ्या खडकावर चित्रं काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं, की यात रंग भरावेत; पण ते कुठून आणणार? त्या दिवसांत काटेसावर फुलते, लालभडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले, की जांभळा रंग मिळतो. शेंदरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा केला. चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं, की त्याचा ब्रश व्हायचा. तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्रं रंगवत बसायचो,
नजर जाईल तिथपर्यंत चित्रंच चित्रं. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा. नदी वाहायला लागायची. आमची चित्रं नदीच्या पोटात गडप व्हायची.
मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे, ते एक उदाहरण आहे. निसर्गकिती परीनं आपल्याला देत असतो; ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे, की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. [8.2.2]
आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा; पण नदी वाहतच असायची. आमचा ‘कॅनव्हास’ म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं? त्यातूनच आम्हांला मातीचा नाद लागला. लालभडक, मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं; पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या
झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या, की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं, की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू…
आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. म्हादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग. फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हांला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागेधागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील, असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकूल तडे जात नव्हते. ‘केवढा आनंद झाला’ हे मला शब्दांत सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना र्किमीडिज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून ‘युरेका युरेका’ करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना; पण तो एक शोध होता.
मुलांनो, मी तुम्हांला एवढंच सांगीन, की तुमच्या प्रत्येकात आर्किमीडिज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. [8.2.3]