Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR4)
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेटजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच. सन १८५३ मध्येग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रूळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना-फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई, नाना शंकरशेट आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा करून बसलेले. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते. ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही, दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रूळांवरून! कमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आता तर काय? विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी
वाफेलाच गाडी ओढायला लावले!
मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली; पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर नि सुखाचा होतो, हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापीटा केला; पण लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे, मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्तेयांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभवही सांगितले. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.
अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा; पण आता काय, अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली.
इकडे इंजनेर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच, खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता सन १८५८ च्या फेब्रुवारीत पुरा झाला. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ‘ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता.
बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला. कसा ती मौज ऐका आता. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पासिंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यांत बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे. सगळा काफिल्ला खोपवलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट-उतरणीचे चार तास धरून, पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा, याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks