Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR3)
तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे, याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली, ‘‘सभ्य स्त्री-पुरुषहो, माझ्या दनविद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी आपल्याला नम्र विनंती करून, मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘शिरीष भागवत’ याच्या फिड्लवादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे, हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे, ही विनंती!’’ एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे, माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती, म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो!
मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता; पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही, हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवंृद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे, हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे, शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला. एका दहा ते बारा वर्षांच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत्वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर! मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि… आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला! कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना! पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता, तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा, सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, ‘‘आपणच का पी. जनार्दन?’’ मी सुहास्य मुद्रेने ‘होय’ म्हणताच तो म्हणाला, ‘‘माझे नाव शिरीष भागवत, घरी ‘श्री’च म्हणतात. मला
गाण्याची फार आवड आहे.’’
‘‘तुला गाण्याची आवड आहे तर!’’
‘‘माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल.’’ त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, ‘‘मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो, की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील.’’ आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, ‘‘मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल!’’
‘‘कबूल! उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का!’’, असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, ‘‘हे माझे वडील, नाना.’’ आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्यांच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वत:च वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच, की मला त्यांना सुचवायचे असते, की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे वीसएक मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. जिवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते.
‘‘आपण जाऊया आता’’, शिरीष म्हणाला व पितापुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले,
‘‘काय कसं काय वाटलं एकंदरीत?’’ ‘‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही.’’ शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला.
‘‘आपण कुठं असता कामाला?’’ भोचकपणे शिरीषच पुन: म्हणाला.
मला वाटले, की मध्येमध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील; पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्वविद्यार्थ्यांत त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहात. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हां हां म्हणता तीन महिने निघून गेले! आणखीन तीन महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा, असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, ‘‘शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे.’’ हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे, तर त्याचा चेहरा काहीसा उतरला! मी विचारले, ‘‘काय, तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का?’’ गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाच उत्तर आले, ‘‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’’
पितापुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी राेज त्याच्याबरोबर येतात, याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे. ती म्हणजे, नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा ही. दुसरेच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखादवेळेस जमले, असे मी समाधान करून घेतले; पण त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही. चौथा दिवस गेला.
पाचवा गेला आणि तसेच पंधरा दिवस गेले! शिरीषचा पत्ता नव्हता. सोळाव्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. ‘‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही’’, असे तो म्हणाला. थोड्याशा त्राग्यानं मी म्हणालो, ‘‘नानांशी त्याला काय करायचे आहे! इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय?’’ शिरीष आला नाही, त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा! मी ताडकन उभा राहिलो व त्याच्या जवळ गेलो.
‘‘अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना?’’
‘‘इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन! माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’’
बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, ‘‘आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?’’ मी खिन्नपणे ‘हो’ म्हणालो!
‘‘मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर. एवढीच इच्छा पुरवा.’’ तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, ‘‘शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो; पण आज माझा नाइलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी दोन महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ?’’
अगतिक होऊन शिरीष म्हणाला, ‘‘सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला!’’ ‘‘तू पुढे जन्मभर वाजव; पण आज वाजवू नको. तुझी मन:स्थितीही आज बरोबर नाही.’’
‘‘मला परवानगी दिलीत, तर माझी मन:स्थिती आपोआपच सुधारेल!’’
शेवटी त्याचे दु:खित मन पुन: आणखी कशाला दुखवा, असा विचार करून मी त्याला परवानगी दिली, मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले.
त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार, तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, ‘‘शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?’’ डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘‘सर, काय ही भलतीच शंका! मी तुम्हांला सर्व सविस्तर सांगतो-
ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले’’
‘‘तुम्हांला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही! माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईंपेक्षा संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहाण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता!’’
‘‘ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की संगीत बंद! पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी, लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. चोवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास! मी सराव करू लागलो, म्हणजे मला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो; पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, ‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’ मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर!’’
शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks