Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR18)
माझ्या आठवणीतला, आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई-ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन-मला शिकवायला आल्या तो दिवस. दोन अगदी परस्परविरोधी आयुष्यं कशी एकत्र येतात, याचं मला नवल वाटतं. ३ मार्च १८८७. मला आठवं वर्षं लागायला तीन महिने बाकी होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते-शांत, कशाच्या तरी अपेक्षेत. आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार ह्याचा मला साधारण अंदाज आला, म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनीसकल्वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. नकळतच माझी बोटं बाजूच्या सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय, याची काही मला कल्पना नव्हती.
त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं, की त्या स्वत:शीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलायत? अशा वेळी वाटतं, सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं. किनारा गाठेपर्यंत ताण असताे. छाती धडधडत असते. वाटतं, आता काय होणार? शिक्षणाला सुरूवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. फरक इतकाच, की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं आणि बंदर किती जवळ आलंय, तेही कळायला काही मार्ग नव्हता. ‘प्रकाश! प्रकाश हवाय मला!’ असं माझ्या आत्म्याचं नि:शब्द आक्रंदन चालायचं. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले.
माझ्या जवळ कुणीतरी येतयसं मला जाणवलं. आईच आहे, असं समजून मी हात पुढे केला. तर दुसऱ्याच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. ह्याच माझ्या बाई, ॲनी सुलिव्हॅन. त्या मला शिकवायला आल्या होत्या, त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला! दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. ‘पर्किन्स इन्स्टिट्युशन’ मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. बाहुली लाॅरा ब्रिजमननं सजवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतरानं कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षरं जुळवली. ‘d-o-I-I’ हा बोटांचा खेळ मला फार आवडला. मीही बाईंप्रमाणं बोटं फिरवू लागले. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. तिच्यासमोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मघाचीच अक्षरं बोटांनी जुळवून लिहिली. मी एक शब्द जुळवत होते, हे काही मला त्या वेळी माहीत नव्हतं. किंबहुना शब्द म्हणून काही असतं, हे तरी मला कुठं ठाऊक होतं? मी फक्त बोटांनी बाईंचं अनुकरण करत होते. नंतरच्या दिवसांत मी ह्याच पद्धतीनं पिन्, हॅट, कप असे कितीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापदंही शिकले. बरेच दिवस बाईंबरोबर राहून राहून, प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं, हे माझ्या लक्षात आलं.
एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी, चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं, d-o-l-l. म्हणजे, दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच! त्या आधी ‘m-u-g’ आणि ‘w-a-t-e-r’ म्हणजे ‘वॉटर’. तर मी हट्टानं म्हणायची, (म्हणजे खाणाखुणा करतच) ‘‘नाही!’’ माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. पुन्हा कधीतरी तानमान बघून हे शब्द शिकवावेत, असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. त्या बाहुलीचे तुकडे होऊन माझ्या पायांशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. वाटलं, बरं झालं, एकदाची पीडा गेली. एवढा थयथयाट करूनही ना खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. ती बाहुली माझी नावडती होती ना! माझ्या निश्चल, अंधाऱ्या जगात हळव्या, हळुवार भावना कुठून उगवणार? बाईंनी मात्र बाहुलीचे ते तुकडे झाडून शेकोटीजवळच एका बाजूला लोटले. माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही हायसं वाटलं. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं, आता बाहेर, छान उबदार उन्हात जायचंय. ह्या विचारानं मी पुन्हा आनंदानं टुणटुण उड्या मारू लागले. पाऊलवाटेनं जात आम्ही विहिरीपाशी आलो. इथंही हनीसकल्वेलीच्या जाळ्या होत्या. त्यांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या पाण्याच्या धारेत बाईंनी माझा हात धरून ठेवला. एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r. आधी सावकाश, मग झरझर. मी एकदम निश्चल उभी राहिले. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालींवर एकवटलं होतं. एकाएकी, इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो, याची अस्पष्ट जाणीव झाली. गमावलेली स्मृती परत येण्यातला थरार मी अनुभवला… w-a-t-e-r वॉ…वॉ…आणि भाषेचं कोडं एकदम माझ्यासमोर जसं उलगडलंच. अरेच्या, पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार, नाचत, उसळत काहीतरी जातं ते? त्या एका जिवंत, चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आणली. प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते; पण लौकरच ते दूर होणार होते.
विहिरीपासून मी परतले, तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावा-नावातून उमलत होता एकेक नवा विचार! घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शागणिक चैतन्यानं थरथरायची. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती. आता त्या दृष्टीतून मी सगळं ‘पाहत’ होते. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपडत शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत राहिले. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चात्ताप झाला, फार वाईट वाटलं.
त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. ते सगळेच काही, नेमके कोणते ते आता आठवत नाही; पण त्या शब्दांत ‘आई’, ‘बाबा’, ‘बहीण’, ‘बाई’ हे शब्द होते एवढं निश्चित. आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्री मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले, तेव्हा माझ्याइतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नसता. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच मला ‘उद्या’ कधी उगवतोय, ह्याची उत्कंठा लागून राहिली होती.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks