Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR8)
सखू आजी परवा वारली, ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही सखू आजीचा मृत्यूमला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं, असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र-निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढतेय. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही. ना माझ्या जातीची ना पातीची; पण तरीही ती माझ्या जवळची होती. रक्ताच्या माणसाइतकीच. सखू आजीचं वय वर्षंे नव्वद. हातात काठी. वाकून कमान झालेलं शरीर. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, ‘‘आजी, कुठं चाललीस?’’ तर लगेच उत्तर ‘‘कुठं जातोय बाबा. म्हातारं माणूस. हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’’ म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही; पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते. कवितेत जगते. तिच्याइतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही.
सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, ‘‘म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला.’’ तर ती लगेच म्हणायची, ‘‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची’’ हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही; पण ती बोलायला लागली, की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हांला गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ. शाळेहून येताना काही वेळ. असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली; पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, ‘‘शेतात एक साप होता. त्याचा माणूस झाला. त्याला पंख फुटले. तो समुद्रावर गेला. चार तपं तपश्चर्या केली. परत आला. त्याचा बैल झाला. खांदा मळला. नांगर जुंपला. फाळाला नागीण डसली. बैलाची दातकुडी बसली. नांगराची नदी झाली. बैलाला आंघोळ घातली. त्याचा साप झाला. नागिणीला घेऊन पळाला…’’ हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यांतून हे सारं आपल्यासमोर घडतं आहे. आपण पाहत आहोत, असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला, की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढं झोपच लागायची नाही. कधी तरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल, असं वाटायचं; पण कैक वर्षांत असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या; पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, ‘‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली’’ आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही.
सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून पुढं असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापय माणसांत ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं. चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही, असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला. गावबैठक बसली. पंच म्हणाले, ‘‘रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच.’’ सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली, ‘‘पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ?’’ सगळे टाळा पगळून बघाय लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले. आपापल्या घराच्या वाटेला लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या
घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते; पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, ‘‘आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला.’’ सखू आजी पंधरा दिवसांत वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्या वेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं.
सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती; पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांतून पाणी आलं. गाव पोरकं झालं.
आता फक्त आजीच्या दंतकथा. घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची?
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks