Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR7)
वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालविण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या; पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, ‘‘काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गढलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काही तरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात.’’
‘‘मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा; पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काही तरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे, की जी किंमतीने कमी असेल; पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल.’’
एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले.
‘‘तुम्हाला ही थट्टा वाटते? पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे.’’ एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली, की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते.
एडिसनने आव्हान स्वीकारले खरे; पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरीत्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. सर हंफ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली, की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा; पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दर वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चीक होते. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा. तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. तो फार प्रखरही नको. त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले.
कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एडिसनने प्लेटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडा फार यशस्वी झाला; पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. ‘‘या बांबूपासून कार्बन करता येईल का?’’ मनात विचार आला, की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषत: आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्या जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले, की पुन्हा कामाला सुरुवात.
सुरुवाती सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे; पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या दोनशे वह्यांची चाळीस हजार पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, ‘‘हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचा! कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत.’’ या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, ‘‘मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का?’’
सतत दहा ते बारा वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्णशोध लागला; पण तो लोकांना माहिती कसा व्हावा? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता २१ ऑक्टोबर १८७९ चा. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रांतून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
२१ ऑक्टोबर १९२९ या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले; पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, ‘‘इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही; पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास नव्याण्णव हिस्सेभाग हा चिकाटीचा आहे.’’
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks