Curriculum
- 20 Sections
- 23 Lessons
- 10 Weeks
Expand all sectionsCollapse all sections
- QUESTION PAPERS4
- 1. सर्वात्मका शिवसुंदरा2
- 2. संतवाणी2
- 3. ‘बेटा, मी ऐकतो आहे!’2
- 4. जी. आय. पी. रेल्2
- 5. व्यायामाचे महत्त3
- 6. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ2
- 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य2
- 8. सखू आजी2
- 9. काझीरंगा (स्थू लवाचन)2
- 10. उजाड उघडे माळरानही2
- 11. कुलूप2
- 12. आभाळातल्या पाऊलवाटा2
- 13. पुन्हा एकदा2
- 14. व्हेनि स2
- 15. तिफन2
- 16. ते जीवनदायी झाड2
- 17. माझे शिक्षक व संस्कार2
- 18. शब्दांचा खेळ2
- 19. विश्वकोश (स्थू लवाचन)2
Assignment (9MAR17)
मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध (जि. सातारा) येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री. हणमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउटमास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउटपथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री. कात्रेमास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणितशिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला. आमचे कात्रेमास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी-कधी त्रास व्हायचा. कात्रेमास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे.
श्री. गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिलीत तर्खडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री. गोळीवडेकर खरे शेतीतज्ज्ञ शिक्षक. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय झाला. त्याचं कारण शाळेच्या ‘बागा’ आमच्यासारख्या मुलांच्या जिवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयानं तसंच हाडा-पिंडाने मोठाड. कष्टाच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हांमुलांच्या जिवावर चांगली फुललेली, उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन-दोन तास राहाटेने ओढून, बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती फुलझाडं-फळझाडं तरारून उभी राहात होती. त्यामुळे श्री. गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी, टिकावाने खांदावयाची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू.
हेडमास्तर श्री. नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. तसे ते शिस्तीचे कडे भोक्ते. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशीरा येईल! असा त्यांचा दरारा.
श्री. नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे ‘रेन-मार्टिन’चे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री. रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं अन्आपली शाळा बरी, हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली.
औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री. नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी, याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही.
श्री. रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एकदोन प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो.
कुस्तीसारख्या खेळातसुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हां मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे, तर कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटकासुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते.
असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फड पाहायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला, ‘याला जोड, याला जोड’ म्हणून फडात फिरवत होतो. दोन राउंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, ‘शंकऱ्या उठतोस का? धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर?’
मी ‘हा हा’ म्हणत मैदानात गेलो आणि लढत करण्याची तयारी दर्शवली; पण मला कुणीतरी ओळखले आणि हटकले.
मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, ‘अरे, समाज अजून निद्रिस्त आहे. खेळात-मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे, हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल, की हे सारे नष्ट होईल. तुम्हांलाही खेळात-स्पर्धेत मानाने बोलवले जाईल.’
असाच एक दुसरा प्रसंग…
शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता; पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता, ते पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती, ते पाहून मास्तर म्हणाले, ‘‘अरे! आज धूलिवंदन! हे चालायचेच!’’ अन् मास्तर तसेच वाटेला गेले. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, ‘‘शंकर! तू हे ध्यानात ठेव. जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा…?’’
सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नव्हतो.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation
Total Marks : 10 x 5 Parts = 50 Marks